शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

शेतजमिनीचा पोत बिघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:27 AM

बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्याने दिवसे - दिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्याने दिवसे - दिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीपरीक्षण करून घेतले यात स्फुरद, नत्र, आणि जस्त या मूलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे.मनुष्याच्या आरोग्या प्रमाणेच जमिनिचे आरोग्य महत्वाचे आहे. आरोग्य बिघडले की लगेच आपण डॉक्टरकडे जातो. तसेच जमिनीचेही आहे. भरघोस उत्पन्न घेण्याचा नादात अनेकजण जमिनीला उसंतच देत नाही. एक पीक काढले की लगेच दुसरे पीक काढायचे त्यात भर म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा मारा, यामुळे जिल्ह्यातील शेतीचा पोत बिघडला आहे. काही वर्ष शेतकºयांना उत्पन्न मिळत मात्र यात शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. बिघडलेले पर्यावरण, कमी पर्जन्यमान तसेच रासायनिक खताचा वापर यामुळे जिल्ह्यातील शेतीचे आरोग्य बिघडले आहे. शेतक-यांच्या जमिनीचे मातीपरीक्षण शेतीचे आरोग्य सुधारावे यातून शेतक-यांना भरघोस उत्पन्न घेता यावे म्हणून शासनाने २०१५ पासून मातीपरीक्षणाची विशेष मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या सव्वापाच लाखांच्या आसपास आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने दोन वर्षात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तब्बल ३ लाख ४३ हजार शेतक-यांनी माती नमुन्याची तपासणी केली आहे. यात निर्देशक क्षारता, आॅरगॅनीक आर्यन, नत्र, पालाश, स्फुरद, तांबे, लोह, जस्त, मॅगनीज, बॉरोन, जमिनीतील ओलावा अशा विविध बारा घटकांची तपासणी करण्यात आली. यात स्फुरद, नत्र, आणि जस्त आदी मुलद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळून आली. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मृद चाचणी विभागाकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतक-यामध्ये जनजागृती करण्यात आली. २०१७ मध्ये ७० हजार शेतक-यांनी माती परीक्षण केले होते. यात वाढ होऊन तब्बल साडेतीन लाख शेतक-यांनी माती परीक्षण केले.सुपीकता घसरण्याची कारणेएकापाठोपाठ सलग पीक घेत राहणे, जमिनी पाणथळ, उथळ फार खोल असणे, सतत एकच पीक घेत राहणे, पूर्व मशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे न करणे, क्षारयुक्त अथवा खा-या पाण्याचा पाण्याचा वापर करणे, सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक खतांचा समतोल वापर थांबविणे, शेणखताचा वापर नसणे आदी कारणामुळे जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे.जमिनीच्या सुपीकेतेसाठी प्रत्येक शेतक-याने आपल्या शेतातील मातीचेपरीक्षण हे करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मातीपरीक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.मातीचा नमुना कसा घ्यावामातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग जमिनीचा खडकाळपणा, उंच सखलपणा, पिकांतील फरक व बागायत / जिरायत स्थिती लक्षात घेऊन शेतीच्या वेगवेगळ्या भागातून माती नमुने घ्यावेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीscienceविज्ञान