शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा जुगाड हिट! एकाच वेळी सहा फवारे, अवघ्या २० मिनिटात एकरभर फवारणी 

By शिवाजी कदम | Updated: July 20, 2023 15:37 IST

स्वतःच्या शेतात फवारणी झाल्यानंतर दुसऱ्यांच्या शेतातही रोजंदारीवर हे जुगाड वापरले जात असल्याने त्याचाही मोठा फायदा या शेतकऱ्याला होत आहे.

टेंभुर्णी: शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता भासत आहे. मशागतीचे सर्व कामे एकाच वेळी निघत असल्याने रोजंदारी वाढवूनही वेळेवर मजूर मिळत नाही. अशावेळी कमी मजुरांत व कमी वेळेत पेरणी, फवारणी आदी शेतीची कामे व्हावी म्हणून ग्रामीण भागात अनेक शेतकरी नवनवीन जुगाड शोधून काढत आहे.

जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील शेतकरी नंदू शिंदे यांनी औषध फवारणीचे असेच एक कमी खर्चिक जुगाड शोधून काढले आहे. यात दोन माणसे एकाच वेळी सहा पंपाचे काम करू शकतात. या अनोख्या जुगाडात एकाच वेळी सहा फवारे निघत असल्याने एक एकर सोयाबीनच्या फवारणीसाठी अवघे वीस मिनिटे लागत आहे. स्वतःच्या शेतात फवारणी झाल्यानंतर दुसऱ्यांच्या शेतातही रोजंदारीवर हे जुगाड वापरले जात असल्याने त्याचाही मोठा फायदा या शेतकऱ्याला होत आहे.

केवळ दोन हजारापर्यंत खर्च

फवारणीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने फवारणीचे काहीतरी जुगाड शोधावे म्हणून मनात विचार आला. आणि लगेच प्रत्यक्ष जुगाड बनवायला सुरुवात केली‌. साध्या पंपावर बनविलेल्या जुगाडात पाईप, बांगडी, नवजल आदी साहित्यांचा वापर केला गेला आहे. यासाठी केवळ दोन हजारापर्यंत खर्च आला आहे. मात्र अवघी दोन माणसे यामुळे सहा माणसांचं काम एकाच वेळी करतात. सोयाबीन प्रमाणेच कपाशी, मका आदीं पिकांसाठी आपण असे जुगाड बनवू शकतो. सध्या इतरांच्या शेताततही फवारणी साठी या जुगाडाला एकरी ५०० रू.प्रमाणे दर मिळत असल्याने स्वतःच्या फवारणीसह नवा रोजगारही मिळत आहे.- नंदू शिंदे, शेतकरी, तपोवन गोंधन.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना