शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठीच निवडणूक रिंगणात-कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:54 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ, भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ, भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.यावेळी बच्चू कडू यांना जालना लोकसभा मतदार संघातून निवडून येण्यासाठीचा कुठला अजेंडा आपल्याकडे आहे काय असे विचारले असता, ते म्हणाले की, आमचे नाते हे वेदनेशी आहे. शेतकरी आज दुष्काळाने हवालदिल झालेल्या बळीराजाला धीर देण्याासह त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपण दानवेंशी लढत देत असल्याचे कडू म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या परीक्षा संदर्भातील पोर्टलमध्ये मोठा गोंधळ असल्याचे सांगून मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही ही बाब भयंकर असल्याचे सांगितले. या पोर्टलमधून केवळ भाजपच्याच कार्यर्त्यांना नोकरी देण्यासाठीची ही उपाय योजना असल्याचे ते म्हणाले.आगामी निवडणुकीत काँग्रेसकडे पूर्वी एवढी ताकद राहली नसून, अन्य पक्षाचा तर विचार न केलेलाच बरा असे सांगून ते म्हणाले की, आपण सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडुन आलो आहोत. त्यामुळे आतही जनता आणि शेतकरी मला विजयी करतील यात शंका नसल्याचे ते म्हणाले. नागपूर येथून अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तुम्हाला येथे पाठविण्यात आले काय असे विचारले असता, त्यांच्या सल्लयानुसार मी पराभूत होईल असा टोला त्यांनी लगावला. भाजच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत असताना तुम्हांला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवे पुरस्कृत केल्यास तुम्ही त्यांचा पाठिंबा घेणार काय या प्रश्नाव त्यांनी नकार देऊन आमपण त्यांना पुरस्कृत करू असा टोला लगावला.भारनियमनाच्या मुद्यावरून त्यांनी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात कधीच भारनियमन होत नाही, केवळ ज्या भागात शेतकरी राहतो त्याच भागाात हे भारनियमन का केले जाते, कारण तो बिचारा अन्याय सहन करण्यासाठी तयार असतो. ही बाब चुकीची असून, उर्जामंत्री बावनकुळे यांचा पुतळा हा मंत्रालयात उलटा लटकवून त्याचा निषेध करणार असल्याचेही आ. कडू यांनी सांगितले. दुष्काळच्या मुद्यावर सरकारने जे निकष लावले आहेत. ते सपशेल चुकीचे असल्याचे सांगून या मुद्यावर ३० आक्टोबरला आम्ही अकोला येथे मोठी दुष्काळ परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस साईनाथ चिन्नादोरे व अन्य पदाधिकाºयांची उपस्थिती होती. ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

टॅग्स :JalanaजालनाBachhu Kaduबच्चू कडूElectionनिवडणूक