शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठ्याची स्वप्नपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:22 IST

जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे. जिल्ह्यात कृषीपंप कार्यान्वित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने शेतक-यांतून नेहमीच ओरड होत होती. यामुळे शेतक-यांना रात्र जागून काढून पिकांना पाणी द्यावे लागते होते. यामुळे शेतक-यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे राज्यातील शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून तसेच महावितरणचे संचालक संजीव कुमार यांच्या पुढाकाराने शेतक-यासाठी सदर योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभर भरघोस प्रतिसादही मिळत आहे. जालना जिल्ह्यातून आतापर्यत २७ हजार शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ९ हजार आठ शेतक-यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार २३२ शेतक-यांनी शुल्काचा भरणाही केलेला आहे. २ हजार शेतक-यांची यादी संबंधित कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. १ हजार शेतक-यांचा स्थळ पाहणी अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ७२ शेतकºयाकडे सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांसाठी ८ हजार २८० रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २४ हजार ७१० तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांसाठी १२ हजार ३५५ रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय पारंपरित वीजपुरवठ्यासाठी रक्कमेचा भरणा करुन प्रलंबीत यादीत असलेल्या संबंधित लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येणार असून त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. प्रथम पैसे भरणा-यांना प्राधान्य या तत्वावर शेतकºयांना सौर कृषीपंप बसवून देण्यात येत आहे. शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.दिवसेदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दगडी कोसळा जाळून वीज निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होत आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उन्ह तापते सौरपंपामुळे शेतक-यांना दर्जेदार वीज उपलब्ध होण्यास मदत होईल. शेतकºयांना दिवसाही शेतीपंपास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलापासून मुक्तता सोबतच डिझेलच्या तुलनेत शून्य खर्च असणार आहे.

टॅग्स :electricityवीजgovernment schemeसरकारी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र