शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेततळ्यांचे फोटो अपलोडिंग अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:44 IST

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात शेततळ्यांचे ९४.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कृषी व महसूल विभागाच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे सुमारे अडीच हजार शेततळ्यांचे फोटो अपलोडिंगचे काम अपूर्ण असल्याने शेतक-यांना अद्याप शेततळ्याचे अनुदान मिळालेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात शेततळ्यांचे ९४.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कृषी व महसूल विभागाच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे सुमारे अडीच हजार शेततळ्यांचे फोटो अपलोडिंगचे काम अपूर्ण असल्याने शेतक-यांना अद्याप शेततळ्याचे अनुदान मिळालेले नाही.मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षाकरिता सहा हजार शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट होते. पैकी पाच हजार ८०० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. जालना तालुक्यात १२३२ पैकी १०१० तर भोकरदन तालुक्यात १२६२ पैकी १२६० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. आठही तालुके मिळवून जिल्ह्यात ५००८ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, पूर्ण कामांची टक्केवारी ८३.४७ इतकी आहे. आतापर्यंत चार हजार ८१३ शेततळ्यांच्या खोदकामासाठी लाभार्थी शेतक-यांना सुमारे २३ कोटी ७९ लाखांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळविण्यासाठी कृषी सेवक, कृषी साहाय्यकांना अ‍ॅपद्वारे शेततळ्याचे फोटो काढून शेतक-याच्या लॉगिन आयडीवर आॅनलाइन अपलोड करणे आवश्यक असते. मात्र, ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करणा-या महसूल व कृषी विभागाच्या अधिका-यांकडून शेतक-यांची अडवणूक केली जात आहे. एका शेततळ्याचे फोटो अपलोड करण्यासाठी आठवडाभराहून अधिक वेळ लावला जात आहे. त्यातच सुट्टी, रजा, इंटरनेट बंद आहे, तुमच्या कामाला वेळ लागेल,अशी वेगवेगळी कारणे सांगून वेळकाढूपणा करण्याचे प्रकार कृषी सहायक व कृषी सेवकांकडून केले जात असल्याच्या तक्रारी शेतक-यांमधून केल्या जात आहे.जिल्ह्यात पूर्ण झालेल्या पाच हजार ८ शेततळ्यांपैकी दोन हजार ६१७ शेततळ्यांच्या फोटो अपलोडिंगचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप दोन हजार ३९१ शेतळ्यांचे फोटो अपलोडिंग अपूर्ण आहे. हे काम अपूर्ण असल्यामुळे बहुतांश शेतक-यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही.कामे करतात दुसरेचग्रामीण भागात अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, कृषीसेवक हे अनेक दिवस गावात येत नाही. अनेकजण आपली कामे पूर्ण करण्यासाठी गावातीलच एखाद्या व्यक्तीला हाताशी धरतात. अनेक महत्त्वाची शासकीय दस्तावेज अशा व्यक्तींकडे सोपविल्या जातात. मात्र, या प्रकारामुळे शेतक-यांची अडणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. शेतक-यांना कामासाठी वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जात आहे.