जालना : पाचनवडगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत येणाऱ्या शाळेतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी आणि सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी यांच्या सेवापूर्ती निमित्त प्राथमिक शाळा (आंबेवाडी) येथे बुधवारी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना तालुक्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संजय जाधव, पी. आर. जाधव यांची उपस्थिती होती. शिक्षण विस्तार अधिकारी नाकाडे यांनी जालना तालुका गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेतल्याबद्दल शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक आणि महिला शिक्षिका, कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणधिकारी यांचा यथोचित सत्कार करून गौरव करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी केंद्रीय प्राथमिक शाळा पाचनवडगाव प्रभारी केंद्रप्रमुख अनंतकुमार शिलवंत आणि प्रभारी मुख्याध्यापक मंगलसिंग धनावत यांचे स्वागत प्रभार स्वीकारल्याबद्दल करण्यात आले. ओम देशमुख, सीमा बदर, मंगलसिंग धनावत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी पाचनवडगाव केंद्रातील अंतर्गत शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.
फोटो ओळ : निरोप समारंभ कार्यक्रमात पी. आर. जाधव, शशिकला केतकर, व्ही. डी. जायभाये, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे, लता चव्हाण, म नईम म. बशीर, केंद्रप्रमुख अनंतकुमार शीलवंत, मंगलसिंग धनावत आदी.
चौकट
या सेवानिवृत्त सत्कारमूर्तीमध्ये सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा कारला बीटचे विस्तार अधिकारी विठ्ठल जायभाये, केंद्रीय प्राथमिक शाळा पाचनवडगाव येथील केंद्रप्रमुख शशिकला केतकर, केंद्रीय मुख्याध्यापक म. नईम म. बशीर, प्राथमिक शाळा येथील माजी मुख्याध्यापिका लता चव्हाण, प्राथमिक शाळा पोकळवडगाव येथील मुख्याध्यापिका शेख यांचा समावेश होता.