शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांची गुंफण करण्यासाठी कौटुंबिक न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:36 IST

नाजूक नात्यांची गुंफण करण्यासाठीच कौटुंबिक न्यायालय असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संयुक्त कुटुंबातील सदस्यांनी उपजीविकेसाठी स्थलांतर केल्यानंतर विभक्त कुटुंबामध्ये विसंवाद निर्माण झाल्याने वाढलेल्या अडचणी व समस्या, त्यातून निर्माण झालेल्या कौटुंबिक कलहाची सोडवणूक आणि वैवाहिक जीवन, मुलांचे संगोपन व निकोप वाढीसाठी त्यांनी एकत्रित येऊन नाजूक नात्यांची गुंफण करण्यासाठीच कौटुंबिक न्यायालय असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे, पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, जालना कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश अभिनंदन पाटंगणकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण उढाण आदींची उपस्थिती होती.रविवारी सकाळी येथे कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे पुढे ते म्हणाले की, वैवाहिक जीवनानंतर कुटुंबातील सदस्यांमधील कटूतेचा परिणाम लहान मुलांच्या मानसिकतेवर व व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडण, संगोपनावर आणि संवेदनशील मनावर होत असतो. या सर्वांमधून मार्ग काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या समुदेशकाने त्यांना एकत्र आणून त्यांचे मनोमिलन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.जर दोघे एकत्र येण्याची कधीच शक्यता नसेल अशी जाणीव झाल्यास त्यांच्यामध्ये जास्त अवधी न घालता पुढील भविष्याची वाटचाल तात्काळ करता यावी म्हणून त्यांना विभक्त होण्याचा मार्ग सुकर करावा. जेणेकरून त्यांच्या आयुष्याचा वेळ वाया न जाता पुढील भविष्याची वाटचाल चांगल्या पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.यावेळी न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी सांगितले की, कौटुंबिक न्यायालयाची संकल्पना १९४० मध्ये अस्तित्वात येऊन तिला १९८४ मध्ये कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.

टॅग्स :Courtन्यायालयFamilyपरिवार