शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढ; शेतकरी फिरकेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:04 IST

हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर फक्त ४५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे, मात्र ८ मार्च रोजी नाफेडने तिसऱ्यांदा तूर नोंदणीसाठी मुदतवाढ जाहिर केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर फक्त ४५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे, मात्र ८ मार्च रोजी नाफेडने तिसऱ्यांदा तूर नोंदणीसाठी मुदतवाढ जाहिर केली आहे. आता २० मार्चपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.शासनाने तुरीला ५६७५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात तुरीला ४८०० ते ५००० रूपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा २०० ते ३०० रुपयांचा फरक असतांना अनेक शेतक-यांनी नोंदणीकडे पाठ फिरविली. शासनाला तूर विकल्यानंतर पैसे मिळण्यास दोन ते तीन महिने विलंब होत असल्याने शेतकरी हमीभाव केंद्राकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. नोंदणीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने नाफेडने ८ मार्च रोजी पत्र काढून नोंदणीला २० मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे.जिल्ह्यातील सहा केंद्रांवर आतापर्यत ४५० शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये जालना २१०, भोकरदन ७०, अंबड ६०, तीर्थपुरी ४०, मंठा ४०, परतूर ३० आदी ४५० शेतक-यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तुरीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे तूर विकून मिळेल त्या भावात शेतकरी तूर विकून मोकळे होत आहेत.दुष्काळाचा फटका : शेतक-यांचे आर्थिक नुकसानशासनाने तुरीला ५ हजार ६७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या हमीभावापेंक्षा २०० ते ३०० रूपये शेतक-यांना क्विंटलामागे कमी भाव मिळत आहे. दुष्काळ असल्याने शेतक-यांना नाईलाजाने तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे. कारण हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री केल्यास दोन ते तीन महिने पैसे मिळत नसल्याने शेतक-यांची आर्थिक अडचण होत आहे. नाफेडने दहा दिवसाची मुदतवाढ दिल्याने नाफेडच्या केंद्रावर नोंदणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र