महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव पुणे यांच्या जाहीर प्रगटनाद्वारे दहावी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलासन पद्धतीने २३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१ पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले गेले होते. मात्र, ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरताना इंटरनेटसंदर्भात अडचणी येत आहे तसेच लॉकडाऊनमुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिलेली नाही. शिवाय बहुतांशी शिक्षक हे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ मध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी होणार असून, मतमोजणी १७ जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी निवडणूक कार्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र ऑनलाइन भरले नसल्याची शक्यता नाकारता येत नाही, याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.
कोट
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ करिता बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे दहावी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संतोष राजगुरू, अध्यक्ष, मराठवाडा विभाग, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना