शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:02 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये दमन राज्यातील विदेशी कंपनीचे ७ दारूचे बॉक्ससह १ लाख २८ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये दमन राज्यातील विदेशी कंपनीचे ७ दारूचे बॉक्ससह १ लाख २८ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाना अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस अधीक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदशर्नाखाली निरिक्षक शहाजी शिंदे, यांना मिळालेल्या माहितीनुसार एका चार चाकी वाहनातून दमण भागातील विदेशी दारू घेऊन माहोऱ्याकडे जाणाार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ सापळा रचला असता एमएच २० एजी. १०४४ या गाडीची तपासणी केली असता, सदर गाडीमध्ये दमन राज्यातील विविध प्रकारच्या विदेशी दारूचे ७ मोठे बॉक्स आढळून आले. या पथकाने गाडीमध्ये असलेल्या कृष्णा पोटदुखे (रा. मादणी, ता़सिल्लोड), व रवि कांबळे (रा. सातारा परिसर, औरंगाबाद) यांची चौकशी केली असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिले.त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे, परतूरचे दुय्यम निरीक्षक सुशिल चव्हाण, जालन्याचे निरिक्षक गणेश पुसे, कर्मचारी रूपाली पंडित, ए़आऱबिजुले, रावसाहेब पल्लेवाड, डी़जे़आडेप, एस़जी़ कांबळे, सी़डी़ पवार यांनी ही कारवाई यशस्वी केली. न्यायालयात संबंधित दोन संशयितांना न्यायालयाने १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागraidधाड