शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

दहावीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी, जालना जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के

By विजय मुंडे  | Updated: June 2, 2023 18:14 IST

जालना जिल्हा विभागात तिसरा; १५ हजार मुले, १२ हजार मुली उत्तीर्ण

जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. जिल्ह्याचा ९३.२५ टक्के निकाल लागला असून, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातील १५ हजार १९० मुलं आणि १२ हजार ९९५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.७९ तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.१७ आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात जालना जिल्ह्याचा निकाल तिसऱ्या स्थानी आहे.

जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभाग, पोलीस दलासह इतर प्रशासकीय विभागाच्या वतीने संयुक्त प्रयत्न करण्यात आले होते. कॉपीमुक्त परीक्षेमुळे जिल्ह्याच्या निकालाचा टक्का घसरतो की काय अशी चिंता अनेकांना होती. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यंदाही जिल्ह्याचा दहावीचा निकाल समाधानकारक ९३.२५ टक्के लागला आहे. जालना जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ३० हजार ४५१ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी ३० हजार २२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, २८ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ६६० मुलांनी व १३ हजार ५६५ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील १५ हजार १९० मुलं आणि १२ हजार ९१५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.१७ टक्के तर मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे. निकाल जाहीर होताच शाळा, महाविद्यालयांच्या वतीने गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

४५ टक्के रिपिटर उत्तीर्णजिल्ह्यातील ३६६ रिपिटर (पुर्नपरीक्षार्थी) मुलांनी परीक्षा दिली होती. यात २४९ मुले व ११७ मुलींचा समावेश होता. त्यातील ११२ मुलं व ५५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. रिपिटर उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४५.६२ टक्के आहेत. त्यात मुलांचे प्रमाण ४४.९७ टक्के तर तर मुलींचे प्रमाण ४७ टक्के आहे.

११ जणांवर झाली होती कारवाईदहावीच्या परीक्षेत गैरमार्गाने कॉपी करणाऱ्या ११ जणांवर पथकांकडून कारवाई करण्यात आली होती. तर जिल्ह्या परीक्षेत्तर गैरप्रकार १७ झाल्याची नोंद राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे आहे.

तालुकानिहाय निकालतालुका- टक्केवारीजालना : ९०.७८बदनापूर: ९३.२५अंबड: ९३.२२परतूर : ९२.४७घनसावंगी : ८९.०३मंठा : ९२.१५भोकरदन : ९७.५०जाफराबाद : ९६.९२

टॅग्स :JalanaजालनाSSC Resultदहावीचा निकाल