शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेसेज पाठवूनही नाफेडच्या पाच केंद्रांवर शून्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:17 IST

नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सात केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी जालना आणि मंठा या केंद्रावर खरेदीस प्रारंभ करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सात केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी जालना आणि मंठा या केंद्रावर खरेदीस प्रारंभ करण्यात आला. मात्र इतर पाच केंद्रावर नोंदणी करुनही शेतकरी फिरकत नसल्याने अद्यापही खरेदी होऊ शकली नाही. यामुळे हमीभाव केंद्रावर खरेदीचा दुष्काळ दिसून येत आहे.जिल्ह्यातील अंबड, जालना, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, मंठा, परतूर या सात ठिकाणी नाफेड आणि राज्य शासनावतीने हमीभाव केंद्र सुरु केली आहे. तूर नोंदणीस तीन वेळा मुदतवाढ देऊनही केंद्रावर शनिवार पर्यंत ७३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जालना आणि मंठा या दोन केंद्रावर तूर खरेदी सुरु करण्यात आली असून शनिवार पर्यंत ६२९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित पाच केंद्रावर शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली संबंधित शेतकऱ्यांना तूर विक्रीसंदर्भात मेसेज सुध्दा पाठविण्यात आले, असे असतानाही तूर विक्रीसाठी शेतकरी हमीभाव केंद्रावर फिरकतच नसल्याचे चित्र आहे. नाफेडने तुरीला ५६७५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे.खुल्या बाजारात तुरीला ४८०० ते ५००० रूपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांना २५० ते ३५० आर्थिक फटका बसत आहे.तूर विकल्यानंतर नाफेडकडून पैसे मिळण्यास दोन ते तीन महिने विलंब होतो. वेळेत पैसे न मिळाल्याने शेतक-यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याची खंत शेतक-यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना मात्र हमीभाव केंद्रावर खरेदीचा दुष्काळ आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड