शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अंदाज समिती;अहवालात ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:40 IST

जालना पालिकेतील अनियमिततेसंदर्भात अंदाज समितीने १९ आणि २० आॅगस्ट २०१५ रोजी जालना पालिकेस भेट देऊन तपासणी केली होती. त्या चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेतील अनियमिततेसंदर्भात अंदाज समितीने १९ आणि २० आॅगस्ट २०१५ रोजी जालना पालिकेस भेट देऊन तपासणी केली होती. त्या चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला असून, यामध्ये पालिकेत अनेक कामे करताना निकष डावलून करण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे.जालना नगर परिषदेत महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीने भेट दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी समितीचे अध्यक्षपद हे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे होते. या समितीने १४ मुद्यांच्या आधारे तपासणी केली होती. त्यामध्ये २०१४-१५ मध्ये तेराव्या वित्त आयोगांतर्गत शिल्लक नसताना विविध कामांचे धनादेश कंत्राटदारांना वितरित करण्यात आले होते. २०१४-१५ मध्येच युआडीएसएसएमटी या योजने अंतर्गत देखील असेच प्रकार करण्यात आले. २०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीत जालना पालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता नसताना खर्च केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच २०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीतील लेखा शिर्षनिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा कमी अधिक खर्च करण्यात आला आहे. त्याबद्दलही संबंधित तत्कालिन अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाहीची शिफारस करण्यात आली आहे. याच कालावधीत नगर परिषद सदस्यांच्या नातेवाईकांना कंत्राट देण्याच्या मुद्यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. नगर पालिकेतील स्वच्छता विभागाकडून वाहन व्यवस्थेसाठी निविदा मागविल्या नसल्याचेही अहवालात नमूद केले आहे. पाणी पुरवठ्या संबंधित एकच काम अभिलेखांमध्ये दोनवेळेस दर्शविण्यात आले आहे. २०११ ते २०१६ या कालावधीत शहरातील रस्त्यांची जी कामे करण्यात आली ती गुणवत्तेनुसार आणि अंदाजपत्रकानुसार करण्यात आली आहेत की नाही. याची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक पथकामार्फत केली आहे काय, असा प्रश्न विचारून त्याची माहिती सादर करण्याचे निर्देशित केले आहे. जालना शहरासाठी अंतर्गत जलवितरण प्रणाली संदर्भातही काही आक्षेप नोंदविले ओहत. २०११-१२ ते २०१५-१६ मध्ये भांडार विभागातील पाणी पुरवठ्यासाठी लागणारे आवश्यक ते रासायनिक साहित्य खरेदी करतानाही निकष डावलल्याचे म्हटले आहे.वार्षिक लेखे (खर्च) हा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर न केल्याचा मुद्दाही गंभीर असल्याचे सांगण्यात आले. रमाई घरकुल योजनेतही अनियमितता असल्याचे दिसून येते. पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी निविदा प्रसिद्ध न करता किंवा सक्षम प्राधिकाºयाची मान्यता न घेता कामे देण्यात आल्याबाबतही ठपका ठेवण्यात आला आहे. मालमत्ता कर निर्धारणासाठी एजन्सी नेमण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सुचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. यात मे आर.एस. पेन्टस या हैदराबाद येथील कंपनीसोबतचा करारनामा रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्याचे दिसून येत नसल्याचा मुद्दाही अहवालात नमूद केला आहे.सदर अहवाल नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी उदय ना. सार्दळ यांच्या स्वाक्षरीने १० जून २०१९ रोजी जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आला असून, जिल्हाधिका-यांनी हा अहवाल मुख्याधिका-यांना सादर केला आहे.एकूणच या अहवालामध्ये तत्कालिन अधिकारी आणि कर्मचाºयांवर शिस्तभंगाच्या कारवाईसह फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित केली आहे. आता या संदर्भात प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदcollectorजिल्हाधिकारी