शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडनंतर जालन्यात 'लंपी'चा शिरकाव; भोकरदन तालुक्यातील ५ जनावरे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 17:08 IST

शेतकऱ्यांनी सर्व गोठे स्वच्छ ठेवावे, फवारणी करून घावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

भोकरदन (जालना):  लंपी स्कीन संसर्गजन्य आजाराचा जालन्यात शिरकाव झाला आहे.  भोकरदन तालुक्यातील  वरुड बु  येथील पाच जनावरे बाधित झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या आदेशाने या गावापासून 10 किलोमीटचा परिसर प्रतिबंधित  करण्यात आला आहे. 

वरुड बु येथील काही जनांवरणा ताप, अंगावर गाठी येणे, डोळ्यातून पाणी गळणे अशी लक्षणे असलेल्या आढळून आली होती. पाच जनावरांची नमुने पशुधन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी पाठवली होती. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुक्यात लंपी स्कीनची शिरकाव झाल्याने शेतकरी व दुग्ध व्यावसायिकात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पशुधन विभागाने विविध उपाययोजनांवर भर दिला असून लसिकरणाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 400 जनावरांना  लस देण्यात आल्याचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी यु. बी. वानखेडे यांनी दिली. तसेच आणखी 1 हजार जनावरांसाठी लस उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुधनचे पथक धडकलेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डी एस कांबळे, उपमुखकार्यकरी अधिकारी कल्पना क्षीरसागर आणि कर्मचाऱ्यांचे यांचे एक पथक आज वरुड बु व इतर गावात दाखल झाले. त्यांनी जनावरांची पाहणी करून माहिती घेतली. 

घाबरून जाऊ नयेशेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. हा आजार संसर्गजन्य असून तो माशा, गोचिड, यांच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व गोठे स्वच्छ ठेवावे, फवारणी करून घावी. हा आजार लवकर लक्षात आल्यावर तो 21 दिवसात बरा होतो. वरुड परिसरात जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.- यु. बी. वानखेडे, प्रभारी पशुधन विकास अधिकारी 

टॅग्स :Jalanaजालना