शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राजुरेश्वराचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:07 AM

मराठवाड्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीचा जन्मोत्सव सोहळा रविवार हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात साजरा झाला.

राजूर : मंत्राचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्याच्या मंगलवाद्यात मराठवाड्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीचा जन्मोत्सव सोहळा रविवार हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात साजरा झाला. काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.जन्मसोहळ्यानिमित्त आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार तथा गणपती संस्थानाच्या अध्यक्ष योगिता कोल्हे व स्थानिक विश्वस्तांच्या हस्ते मंत्रोच्चारात सकाळी नऊ वाजता महापूजा अभिषेक करून श्री मूर्तीस वस्त्रालंकार चढविण्यात आले. दुपारी १२ वाजता महाआरती झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्याच्या मंगल वाद्यात श्री जन्म सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणाचा भक्तांनी अनुभव घेतला.मंदिराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचा समारोप ह.भ.प. दयानंद महाराज सेलगावकर, आ.नारायण कुचे, भीमराव महाराज दळवी व सप्ताह समितीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ह.भ.प.रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्र्तनाने झाला. समारोपानंतर १११ क्विंंटल अन्नदानाच्या महाप्रसादाचा लाखो गणेश भक्तांनी लाभ घेतला.या प्रसंगी के.आर.सोळंके यांनी राजूर येथे वारक-यांसाठी निवासस्थान उभारण्याची मागणी केली. यावेळी सप्ताहात ज्ञानदान, अन्नदान व योगदान देणा-या विविध संस्था व मान्यवरांचा सप्ताह समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्री जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांनी सप्ताहभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सोहळ्यात महाराष्टÑातील नामवंत संत महंतांनी सोहळ्याला हजेरी लावून कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा, हुंडाबंदी, शैक्षणिक, स्वच्छता मोहीम समाजातील अनिष्ट परंपरेवर प्रहार करीत समाजप्रबोधन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या सोहळ्यासाठी साहेबराव भालेराव, माजी जि.प.अध्यक्ष रंगनाथ काळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, माजी सरपंच शिवाजी पुंगळे, सुधाकरराव दानवे, गजानन नागवे, माजी जि.प.सदस्य रामेश्वर सोनवणे, आशाताई साबळे, कैलास पुंगळे, व्यवस्थापक गणेशराव साबळे, उपसरपंच विनोद डवले, बाबूराव खरात, प्रशांत दानवे, शशिकांत शिंदे, भिकनराव पुंगळे, विष्णू राज्यकर, श्रीमंता पुंगळे, अण्णासाहेब भालेराव, संयोजक विष्णू महाराज सास्ते, जगन्नाथ थोटे, देवराव डवले, श्रीराम पंच पुंगळे, भगवान नागवे, राहुल दरक, ज्ञानेश्वर पुंगळे, विनायक जगताप, मुकेश अग्रवाल, नारायण पुंगळे, रामेश्वर टोणपे, कृष्णा जाधव, बबन मगरे यांनी पुढाकार घेतला.--------------पालखी मिरवणुकीचे स्वागतशनिवारी रात्री ९ वाजता टाळमृदंगाच्या गजरात गावातून श्रीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी समोर भजनी मंडळ भजने गात तर बँण्डच्या तालावर युवक गुलालाची उधळण करीत गणरायाचा जयघोष केला. घरोघरी पालखीचे स्वागत करण्यात आले. स.पो.नि.किरण बिडवे यांच्यासह कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.