शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड- दक्षिण आफ्रिका सामन्यावर रांजणीत सट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:56 IST

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील मेडिकलमध्ये इंग्लंड- द. आफ्रिका टी-टष्ट्वेंटी मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्याविरूध्द एडीएस पथकाने (दरोडा प्रतिबंधक पथक) कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील मेडिकलमध्ये इंग्लंड- द. आफ्रिका टी-टष्ट्वेंटी मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्याविरूध्द एडीएस पथकाने (दरोडा प्रतिबंधक पथक) कारवाई केली. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली असून, कारवाईत ५७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रांजणी बसस्थानकाजवळ असलेल्या मेडिकल दुकानात इंग्लंड- साऊथ आफ्रिका टी- ट्वेन्टी मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने रविवारी रात्री रांजणी येथील आनम मेडिकल दुकानावर कारवाई केली. मेडिकलमध्ये असलेल्या अख्तर अली सय्यद अली (रा. रांजणी) याच्या मोबाईलची तपासणी केली असता मून एक्सचेंज ९९ लिंक सुरू होती. यात इंग्लंड- साऊथ आफ्रिका टी- टष्ट्वेंटी मॅच सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी केल्यानंतर सय्यद याने सांगितले की, ती लिंक जालना येथील रोहित यांनी पाठविली आहे. त्यांच्या सांगण्यावरून मला सट्ट्यात जिंकलेले पैसे रोहित देतो. तसेच दीपक (रा. सेलू जि.परभणी) यांनी रोहितची ओळख करून दिली. त्या दोघांच्या सांगण्यावरून आपण मॅचमध्ये हार-जीतवर सट्टा घेत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी मोबाईल, रोख ४७ हजार ८०० रुपए असा एकूण ५७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वरील तिघांविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, राजू पवार, विजय निकाळजे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Satta Bazarसट्टा बाजारCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी