शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

साठे व्याख्यानमालेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:04 IST

तीन दिवसीय आयोजित अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी गायिका पंचशीला भालेराव (औरंगाबाद) यांच्या जलसा या कार्यक्रमाने करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तीन दिवसीय आयोजित अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी गायिका पंचशीला भालेराव (औरंगाबाद) यांच्या जलसा या कार्यक्रमाने करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून समाजसेवक एम. पी. पवार यांची उपस्थिती होती.यावेळी गायिका पंचशीला भालेराव, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रशांत नवगिरे, नगरसेवक विनोद रत्नपारखे, नगरसेवक अमीर पाशा, अखिल भारतीय सेनेचे गणेश चांदोडे, औरंगाबादचे नगरसेवक राजू अहिरे, इचलकरंजी बँकेचे शाखा व्यवस्थापक पोहोळ, जीवन खंडागळे, योगेश रत्नपारखे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी विविध क्षेत्रांत मातंग समाजाचे नाव उंचावल्या बद्दल अभिनेत्री पुष्पा पिसुळे, मिस इंडिया २ प्रतीक्षा नवगिरे, डॉ. अंजली डोईफोडे, अ‍ॅड. पौर्णिमा जाधव यांचा शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी सचिव बंडूभाऊ डोईफोडे, उपाध्यक्ष मनोज बीडकर, मुकेश कुचेकर, कोषाध्यक्ष सचिन निकाळजे, सहसचिव संतोष तुपसौंदर, प्रकाश लोंढे, मुख्य संयोजक शिवराज जाधव, सी. के. डोईफोडे, गणेश भालेराव, प्रा. डॉ. विजय कुमठेकर, शांतीलाल लोंढे, हंसराज मोरे, रवींद्र म्हस्के, करूणा नामवाड आदींनी परिश्रम घेतले.यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत म्हणाले की, अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचा उपक्रम स्तुत्य आहे. या व्याख्यानमालेतून विचारांचे आदान प्रदान होणे गरजेचे आहे.यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जालन्यात व्याख्यानमालेची परंपरा सुरू करण्यात आली आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी जालन्यातील सर्व समाजबांधव आम्हाला मदत करतात ही एक समाधानाची बाब आहे. आगामी काळातही आम्ही अण्णा भाऊ साठेंचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी शालेय पातळीवर निबंध स्पर्धा तसेच वाद-विवाद स्पर्धा घेणार असल्याचे नवगिरे यांनी समारोपप्रसंगी सांगितले.गाण्यावर घेतला श्रोत्यांनी ठेकायावेळी गायिका पंचशीला भालेराव यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांनी त्यांच्या गाण्यावर श्रोत्यांना ठेका धरावयास लावला. याप्रसंगी अभिनेत्री पुष्पा पिसुळे यांनी नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज मोरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष नगरसेवक विजय कांबळे यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिकmusicसंगीत