शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:23 IST

जालना : शहरातील सार्वजनिक जागांवरील रहदारीस अडथळा ठरणाºया १०९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण नोव्हेंबरअखेर हटविण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच ...

जालना : शहरातील सार्वजनिक जागांवरील रहदारीस अडथळा ठरणाºया १०९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण नोव्हेंबरअखेर हटविण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच ही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक जागांवरील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने पालिकेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात नवीन जालना व जुन्या जालन्यात मिळवून सुमारे ४५० ठिकाणी धार्मिक स्थळांची अतिक्रमणे आढळून आली आहेत. पैकी १७ ठिकाणची अतिक्रमणे पालिकेने या पूर्वी मोहीम राबवून काढून टाकली, तर रहदारीस अडथळा न ठरणारी बहुतांश अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रिया राबवून नियमित केली आहेत. या आठवड्यात शहरातील १०९ ठिकाणी असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यासाठी नगर पालिकेने पोलीस प्रशासनास लेखी पत्र दिले आहे. आवश्यक बंदोबस्त मिळताच शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरुवात करण्यात येणार आहे. तर शक्य तिथे स्थानिक नागरिकांशी चर्चा करून अतिक्रमण काढले जाणार आहे.-----------सार्वजनिक जागांवरही अतिक्रणशहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक सार्वजनिक जागा आहेत. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण करून मोक्याच्या जागा बळकविण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. परिणामी पालिकेच्या अनेक मालमत्तांबाबत वाद निर्माण झाले आहेत. शहरात पूर्वी काही भागांत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या जागांवरही अतिक्रमण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून अतिक्रमण केले जात आहे. या मुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी या प्रकाराकडे कानाडोळा केल्याचे पाहावयास मिळत आहे.-------------अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे आवश्यक नियोजन केले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली ही कारवाई केली जाणार आहे. नोव्हेंबरअखेर सर्व धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढली जातील.संतोष खांडेकर मुख्याधिकारी, नगर पालिका, जालना.