शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव मोहीम दुस-या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:23 IST

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम मंगळवारी दुस-या दिवशीही सुरूच होती. नवीन जालन्यात आझाद मैदान ते मंठा ...

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम मंगळवारी दुस-या दिवशीही सुरूच होती. नवीन जालन्यात आझाद मैदान ते मंठा चौफुली दरम्यान असलेली अतिक्रमणे दिवसभरात हटविण्यात आली. तसेच एसआरपीएफ वसाहती समोर अनधिकृतरीत्या थाटलेली दुकानेही या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली.अतिक्रमण हटाव मोहिमेला सकाळी आझाद मैदान परिसरातील साई मंदिरापासून सुरुवात झाली. संपूर्ण मंदिरच पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी नगरपालिका व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आझाद मैदान परिसरातील हनुमान मंदिराचे अतिक्रमणही हटविण्यात आले. त्यानंतर अतिक्रमण हटाव पथकाने आपला मोर्चा मंठा चौफुलीकडे जाणा-या रस्त्यावर उजव्या बाजूने थाटण्यात आलेल्या दुकानांकडे वळविला. एसआरपीएफ वसाहतीसमोरील रस्त्यावर थाटण्यात आलेली जवळपास १५ गॅरेज, मांस विक्रीची दुकाने, हॉटेल्स, टपºया पथकाने जमीनदोस्त केल्या. मंगळवारी झालेल्या कारवाईत मंठा चौफुलीवरील हजरत सय्यद सादक दर्गा, साई मंदिर, सिंदखेडराजा रस्त्यावरील म्हसोबा मंदिर, सुखशांतीनगरातील बजरंगबली मंदिर, पेन्शनपुºयातील शीतलामाता मंदिर, गोपाळपु-यातील लक्ष्मीमाता मंदिर, गोपीकिशन नगरातील जयमाताई मंदिर, बसस्थानक रस्त्यावरील संग्रामनगरातील साईबाबा मंदिर, फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरातील म्हसोबा मंदिर, राजबिल्डिंग परिसरातील सय्यद सादक दर्गा ही धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्यात आली. शहरातील सर्व १०९ धार्मिक स्थळांची अतिक्रमणे जोपर्यंत हटविली जात नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील, असे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी स्पष्ट केले.