शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाच्या जागेवर पोलीस बंदोबस्तात ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:53 IST

येथील रेल्वेस्थानकासमोरील एसटी महामंडळाच्या जागेवर एका व्यक्तीने बेकायदेशीररीत्या केलेला ताबा सोमवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील रेल्वेस्थानकासमोरील एसटी महामंडळाच्या जागेवर एका व्यक्तीने बेकायदेशीररीत्या केलेला ताबा सोमवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला. या जागेवर आता महामंडळाने कब्जा केला असून, तसा नोटीस बोर्डही या ठिकाणी लावण्यात आला आहे. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.शहरात एसटी महामंडळाची मुख्य बसस्थानकासह रेल्वेस्थानकासमोर जागा आहे. दोन्ही ठिकाणच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. एसटीचे विभागीय नियंत्रक यु.बी. वावरे यांनी सांगितले, की रेल्वेस्थानकासमोर सर्वे क्र. ७१३३ या भूखंडावर महामंडळाला राज्यनिर्मितीपासून रोड ट्रॉन्सपोर्ट विभागाकडून एक एकर जागा मिळाली आहे. या जागेवर बशीर खान फतरु खान या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सर्वे क्रमांक बदलून ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता. जागेवर अतिक्रमण केले होते. न्यायालयाने मनाई हुुकूम उठविल्यानंतरही सदर व्यक्ती जागा सोडण्यास तयार नव्हती. जागेवर कब्जा करण्यासाठी गेलेल्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासन, महसूल व भूमिअभिलेख कार्यालयास रीतसर पत्र देऊन या जागेची मोजणी सोमवारी दुपारी करण्यात आली.या वेळी अतिक्रमण करणा-यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना शासकीय कार्यवाहीत हस्तक्षेप न करण्यास सांगितले. भूमिअभिलेखच्या अधिका-यांनी जागेचे मोजमाप केले. त्यानंतर एसटी महामंडळाने येथील कब्जेदाराचे बोर्ड हटवून विभागाचे बोर्ड लावले.नियोजन : पोलिसांचा फौजफाटाया ठिकाणचे अतिक्रण हटविण्यासाठी या पूर्वीही एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते.मात्र, संबंधितांनी त्यांना धमकावत हाकलून दिले. याबाबत महामंडळाच्या अधिका-यांनी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यामुळे आज पोलिसांना पत्र देऊन या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणstate transportराज्य परीवहन महामंडळ