शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:15 IST

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

जालना : जिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दुपारी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षबागा, शेडनेटमधील बियाणे पिके, भाजीपाला, गहू, ज्वारी, हरभरा ही पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अगोदरच बोंडअळीमुळे कापसाचे पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला होता. त्यातच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाने बळीराजा कोलमडून गेला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार व शेडनेटमध्ये पिके घेणाºया शेतकºयांना एकरी पाच लाख रुपये फळे व भाजीपाला उत्पादकांना एकरी दोन लाख व हंगामी पिके घेणाºया शेतकºयांना एकरी पन्नास हजार रुपये या प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. वंजार उम्रद व निवडुंगा येथील शेतकºयांना शासनाने मदत करावी, असे निवेदनात नमूद आहे. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. संतोष सांबरे, पंडितराव भुतेकर, अ‍ॅड. भास्कर मगरे, भाऊसाहेब घुगे, संतोष मोहिते, बबनराव खरात, यादवराव राऊत, अ.माजिद कुरेशी, प्रभाकर घडलिंग, सुधाकर वाढेकर, सर्जेराव शेवाळे, ब्रह्मा वाघ, रमेश वाघ, बबन जाधव, कडुबा इंदलकर, विठ्ठलराव खरात, दत्ता खलसे, गणेश खरात, संतोष खरात आदींची उपस्थिती होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, बबलू चौधरी, शहराध्यक्ष राजेश राऊत, जयंत भोसले आदींची उपस्थिती होती.भरपाईस उशीर नको- टोपेजिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी. नुकसान भरपाई देण्यास शासनाने विलंब लावू नये, अशी मागणी आ. राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीचे केवळ पंचनामे झाले असून, बाधित शेतकºयांना अद्याप मदत मिळालेली नाही. खरिपात झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकºयांना मिळालेली नाही, त्याचबरोबर तूर हमीभाव केंद्रावरील जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या अटी रद्द कराव्यात, जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाला लगामा लावावा या मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.