लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : अंत:करणातून सहा विकार नष्ट केले तर परमात्म्याची प्राप्ती होईल, असे निरूपण भागवत कथा सांगताना भागवताचार्य श्री १०८ स्वामी परमेश्वर यती यांनी दिले.
तालुक्यातील रेवलगाव येथे श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कथेचा विस्तार करताना स्वामी परमेश्वर महाराज म्हणाले की, मानवी जीवनाचा उद्धार आणि संसार बंधनातून मुक्ती या चार आश्रमातून चार पुरूषार्थांची प्राप्ती होते. तसेच जीवनमुक्ती ज्ञान, वैराग्य, भक्तीचा आनंद हे जीवनाचे एकमेव उद्दिष्ट म्हणजेच भागवत कथा श्रवण होय. ज्यावेळी अंत:करणात सहा विकारांचा बोध होऊन सातव्यांदा प्राप्त होतो व आठव्यांदा कृष्ण परमात्मा विराजमान होतो. अंंत:करणातून विकार नष्ट करणे म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती होय, असे सांगेून कृष्ण जन्म सोहळा व कृष्णाच्या विविध लीला आपल्या रसाळ वाणीतून भाविकांना सांगताना उपस्थितांसमोर भागवत कथेचे चित्र उभे केले. यावेळी ह. भ. प. रामप्रसाद महाराज व्होंडेगावकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.
फोटो