भोकरदन : येथील सावंत हॉस्पिटलसमोरील पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. मंदाभाऊ रामा इंगळे (७५) असे मृत वृद्धाचे नाव आहे.मंदाभाऊ इंगळे हे नियमित या रस्त्याने ये- जा करताना काही वेळ ते पिंपळाखालील ओट्यावर बसून आरामही करायचे. सोमवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली बसले. काही वेळ आराम केल्यानंतर ते निघाले असता पिंपळाची वाळलेली फांदी त्यांच्या डोक्यात पडली. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील परिचारिका पुष्पा कानडजे यांनी धावपळ करूनही उपयोग झाला नाही. नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
झाडाची फांदी अंगावर पडून वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:31 IST