शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे यांची जाफराबाद येथील न्यायालयात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:35 IST

जाफराबाद न्यायालयात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या शेतकरी विरुद्ध वक्तव्य प्रकरणाची उलट तपासणी करण्यात येऊन न्यायालयाने फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद न्यायालयात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या शेतकरी विरुद्ध वक्तव्य प्रकरणाची उलट तपासणी करण्यात येऊन न्यायालयाने फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली.एकनाथ खडसे यांनी एका जाहीर सभेत शेतकऱ्याकडे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत, परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाही असे वक्तव्य केले होते. यामुळे शेतकºयांचा अवमान झाला आहे, असा आरोप करून एकनाथ खडसे यांच्याविरोधात जाफराबाद येथील शेतकरी सुरेश गवळी यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.जाफराबाद न्यायालयाने ३१ आॅगस्ट २०१७ रोजी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावून जाफराबाद न्यायालयात हजर राहण्या विषयी समन्स बाजवले होते. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जाफराबाद न्यायालयात हजर राहिले. यावेळी एकनाथ खडसे यांनी अ‍ॅड. रामेश्वर अंभोरे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यावेळेस पंधरा हजार रुपये दंड भरून खडसे यांना जामीन मंजूर केला होता.यावेळी खडसे यांच्यासोबत न्यायालयात यावेळी गोविंद पंडित, सभापती साहेबराव कानडजे, भाऊसाहेब जाधव, सरपंच संतोष लोखंडे, सुरेश दिवटे, सुधीर पाटील, विजू परिहार, उद्धव दुनगहू, साहेबराव मोरे, विजय सोनवणे, दगडूबा गोरे, निवृत्ती दिवटे, सय्यद मतीन, अजीम शेख, अमोल पडघन, पिंटू वाकडे आदींची उपस्थिती होती.मंगळवारी जाफराबाद न्यायालायत न्यायाधीश शैलेश चिकने यांच्या समोर माजी मंत्री एकनाथ खडसे आज हजर राहिले. मंगळवारी न्यायालयाने केवळ फिर्यादी पक्षाची उलट तपासणी घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी ही १८ सप्टेंबरला होणार आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेCourtन्यायालय