शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच सदस्यांसाठी उद्या ‘एकापेक्षा एक अप्सरा’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:31 IST

शहरातील सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.सखी मंच सदस्य नोंदणीस ३१ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. लोकमत सखी मंच सदस्य होण्यासाठी महिलांची प्रथम पसंती असते. दर वर्षी जुन्या सदस्यांबरोबर नवीन शेकडो महिला या मंचच्या भाग होण्यासाठी इच्छुक असतात. हे लक्षात घेता वर्षभरात लोकमत सखी मंच सदस्यांसाठी एकापेक्षा एक सरस मनोरंजनात्मक कार्यक्रम, भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी लोकमतने उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक सखी मंच सदस्याला अंजली किचन जंबो सेट, जागर स्त्री शक्तीचा हे विशेष महिलांशी संबंधित बुक, सखी मंच ओळखपत्र, तसेच पाच हमखास वस्तू कूपन भेट मिळणार आहे. त्याचबरोबर गोल्डन धमाकामध्ये राज्य स्तरावर एक लाख ५१ हजारांपासून ११ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची पाच हमखास बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. सोबतच वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सखी मंच सदस्यांना देण्यात येणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीच्या अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, गीता कॉम्प्लेक्स, भोकरदन नाका येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.