शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्रीतून आठ विद्युत मोटारी लंपास; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

By शिवाजी कदम | Updated: July 28, 2023 18:39 IST

शहागड तालुक्यातील वाळकेश्वर, कुरण शिवारातील घटना

शहागड : आठवडी बाजारात मोबाईल चोर, बसस्थानक परिसरात मनी मंगळसूत्र, पाॅकेट चोर, महामार्गावर दुचाकी चोर हे प्रकार व गुन्हे सर्वपरिचित आहेत. आता चोरांनी शेतकऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. शहागड, वाळकेश्वर, कुरण परिसरातून शुक्रवारी सकाळी आठ मोटारी चोरीला गेल्याचे आढळून आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. 

अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीतून एक नाही तर तब्बल आठ विद्युत मोटारींवर हात साफ केला आहे. अज्ञात चोरांनी वाळकेश्वर व कुरण शिवारातील हमीद फुलारी, कदीर बागवान, इलियास बागवान, अलीम तमीजोद्दीन, शाहेद बागवान, ताजोद्दीन बागवान या शेतकऱ्यांच्या गोदावरी नदी काठावर असलेल्या तब्बल आठ विद्युत मोटारी चोरी गेल्या आहेत. नवीन विद्युत मोटारसाठी पंचवीस हजार रुपये लागतात. तर जूनी मोटार भरून घ्यावयाची असल्यास आठ हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी इलियास बागवान, शाहेद बागवान यांनी सांगितले.  

वजनदार मोटारी नेल्या कशाविद्युत मोटारीचा कना म्हणजे त्यात असलेली तांब्याची तार.  बाजारात तांब्याच्या तारीचे बाजारमूल्य  एक हजार रुपये किलो आहे. एक मोठ्या विद्युत मोटारीत पाच किलो तांब्याच्या तारांचा वापर होतो. त्यामुळे चोरट्यांना वजनदार मोटारी उचलून घेऊन जाणे जिकीरीचे काम असल्याने ते जागेवर मोटार खोलून त्यातील तांब्याची तारी काढून घेऊन जातात. वाळकेश्वर, कुरण शिवारात चोर आठ विद्युत मोटारी थेट उचलून घेऊन गेले आहेत. एका मोटारीचे वजन जवळपास पंधरा ते वीस किलो असते. एवढी जड विद्युत मोटारी लांबवल्याने या भागातील शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना