शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जालन्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा, आठजण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 19:39 IST

मंठ्यात चारजणांना अटक

जालना : जालना व मंठा शहरातील हॉटेल्समध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान रविवारी रात्री सुरू असलेल्या सामन्यावेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी महागडे मोबाईल्स, एलसीडी टीव्ही व रोख सव्वा दोन लाख रुपये जप्त केले. शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी रात्री उशिरा द ग्रेट मंमादेवी हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी काहीजण टीव्हीसमोर बसून राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना आढळून आले. पोलिसांनी संशयित अमित हिरालाल रठ्ठैय्या (२७, रा. कपडाबाजार), विनोद दादुराव रठैय्या ( ४२, रा. आदित्य कॉम्पलेक्स), शेख नजीर शेख इब्राहीम (४३ रा. खडकपुरा), रुपेश गणेश घोडके ( ३२, रा. लालबाग) यांना ताब्यात घेतलं. यातील हिरालाल रठैय्या व अन्य एक मुख्य बुकींसोबत मोबाईलवर संपर्क करून, तसेच टेलिग्रॉम अ‍ॅपवर ऑनलाइन लिंक तयार करून सट्टा लावत होते. मुख्य बुकी संशयित सोनू चौधरी, विनोद भगत, सुरज काबलिये हे फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या कारवाईत महागडे मोबाईल्स, एलसीडी टीव्हीसह रोख एक लाख ७४ हजार ३५० जप्त केले. संशयितांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, विशेष कृती दलाचे यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक महादेव राऊत, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, शिवाजी जमधडे, मनोज काळे, कैलास खार्डे, संदीप बोंद्रे, संतोष पवार, सुधीर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, किरण चेके, देविदास भोजणे, श्रीकुमार आडेप यांनी ही कारवाई केली.मंठ्यातही चौघांना अटकमंठ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी  रविवारी रात्री पथकासह शहरातील एका हॉटेलमध्ये छापा आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या चार संशयित बुकींना ताब्यात घेतलं. अमोल  गणेशराव मोरे (रा. देवठाणा), भागवत रामदास कव्हळे (रा. वांजूळा) दीपक रामेश्वर तोडकर (रा. तुकारामनगर) व दीपक महादेवराव बोराडे (रा. बोराडेगल्ली, मंठा), अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सात मोबाईल्स, एलसीडी टीव्ही व रोख ५० हजार रुपये जप्त केली आहे. 

टॅग्स :IPLआयपीएलCricketक्रिकेट