ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षीय राजकारणापेक्षा गट, वाडा, खूंट, भाऊबंदकीच्या मुद्यांवरच अधिक भर देऊन लढविली जाते. तालुक्यातील ९१ पैकी ७२ ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आहे. तर १९ ग्रामपंचायती राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व इतर पक्षांच्या ताब्यात होत्या. गेल्या वेळी राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे गावाचा विकास व निधी मिळविण्यासाठी अनेकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचा फायदा लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला झाला होता. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. सध्या तरी तालुक्यात भाजपा विरुद्ध आघाडी अशीच निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत ९२ पैकी ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यात बानेगाव, दगडवाडी, दावतपूर, मालखेड, आणवा पाडा, धोंडखेडा, मुठाड, सुभानपूर, दहिगाव या गावांचा समावेश आहे. यावेळी सुध्दा काही गावात निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी बैठका होत आहे. तालुक्यातील जवखेडा खु. व मानापूर या दोन गावाच्या निवडणुका गेल्या ३० वर्षांपासून बिनविरोध होत आहे.
------------------------------------------------