शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राजुरात शेतकऱ्याचा विषप्राशनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:04 IST

अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या अचानक उद्भवलेल्या प्रकारामुळे उपकेंद्रात मोठा गोंधळ उडाला होता.याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पिंपळगाव थोटे येथील गट क्रमांक १५९ मध्ये ईन्फ्रा योजनेअंतर्गत नवीन रोहित्र बसवण्यात आलेले आहे. सदर रोहित्रावरून समांतर वीज जोडणी देण्याची मागणी शेतकरी सचिन थोटे, नारायण थोटे, रवींद्र थोटे, विनायक साळवे, भीमराव गायकवाड यांनी अनेक वेळा राजूर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याकडे केली. मात्र, संबधित अधिकारी शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतक-यांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. शेतकºयांनी यापूर्वी अनेकवेळा महावितरणच्या अधिका-याकडे मागणी केली तसेच १७ मार्च २०१८ रोजी राजूर उपकेंद्रासमोर उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित अधिका-यांनी नवीन रोहित्रावरून वीज जोडणी करून देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. परंतू दोन महिने झाले तरी वीज जोडणी करून मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या सचिन थोटे या शेतकºयाने बुधवारी दुपारी साडेचार वाजता राजूर उपकेंद्रात येऊन वीज जोडणीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करून खिशातून विषारी द्रवाची बाटली काढून तोंंडाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच्या शेतकरी व कर्मचा-यांनी वेळीच त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांना रोखले तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी