शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात खचून न जाता शेळीपालनातून साधली आर्थिक प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:25 IST

यशकथा : हा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून कर्जही काढले नसल्याचे त्यांनी सांगितले.

- फकिरा देशमुख  ( जालना ) 

दुष्काळी परिस्थितीमध्ये खचून न जाता, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या तीन- चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत असे असतानाही गोकुळ, ता. भोकरदन येथील शेतकरी उत्तम बंडू पालोदे यांनी शेतीपूरक असलेल्या शेळीपालनाच्या व्यवसायातून चांगली आर्थिक उन्नती साधली आहे.

केळना या छोट्याशा नदीच्या काठावर गोकुळ हे गाव वसलेले आहे. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाला भोकरदन तालुकाही  अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे हैराण झाले आहेत. शेतीचा व्यवसाय तोट्यात जात असल्याने आता काय करावे असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. सततच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी येथील शेतकरी उत्तम पालोदे यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निश्चय केला. त्यांच्याकडे दहा एकर शेतजमीन आहे. परंतु कोणता शेतीपूरक व्यवसाय परवडेल याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. यातच त्यांच्या शेजारच्या गावातील शेतकरी विनोद गावंडे यांनी शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर असल्याचे सांगून मीसुद्धा तो करण्याचा निश्चय केल्याचे सांगितले. यानंतर उत्तम पालोदे यांनीही शेळीपालन करण्याचे ठरविले.

मात्र, तांत्रिकदृष्ट्या शेळीपालन कसे करावे याबाबत त्यांना माहिती नव्हते, त्यामुळे मनात अनेक शंका-कुशंका होत्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित धुमाळ, डॉ. गायकवाड यांनी हा व्यवसाय कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. उत्तम पालोदे यांनी नंतर पडेगाव (औरंगाबाद) येथून सुरुवातीला ६० ते ७० हजार रुपये खर्च करून १० उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. त्यासाठी ८०० स्क्वेअर फुटांचे टीनच्या पत्र्यांचे शेड तयार करून तीन वर्षांपूर्वी  हा व्यवसाय सुरू केला. उत्तम नियोजन व व्यवस्थापनाने पालोदे यांचा हा व्यवसाय फायद्यात पडला असून, दरवर्षी त्यांना खर्च वजा जाता दोन लाखांपर्यंत निव्वळ नफा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे बोकड किवा शेळी विक्रीसाठी  कोणत्याही बाजारात जावे लागत नाही. व्यापारी घरपोच बोकड खरेदी करण्यासाठी गावात येतात, असे उत्तम पालोदे यांनी  सांगितले. हा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून कर्जही काढले नसल्याचे त्यांनी सांगितले. खर्चाची तरतूद नसेल तर, कमी शेळ्यांवर व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला उत्तम पालोदे देतात. शेळ्यांना खाद्य म्हणून ते शेतात हिरवा घास नियमित टाकतात. तसेच मक्याच्या कडवळीचाही उपयोग खाद्य म्हणून करतात. जनावरांच्या आजाराबाबत ते सजग असून, चाहूल लागताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो किंवा उपचार केले जातात. आज पालोदे यांच्याकडे ४० लहान मोठ्या शेळ्या असून अनेक बोकड विक्री केले आहेत. व्यापाऱ्यांना विक्री करताना आपण बोकडाचे वजन करूनच विक्री करीत असल्यामुळे इतरांपेक्षा आपणास जास्त पैसे मिळतात, असे पालोदे यांनी सांगितले़

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी