शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मार्चनंतर ई-वे बिल लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:27 IST

आगामी मार्च महिन्यानंतर राज्यासह देशभरात ई-वे बील लागू होणार असून, ते कुठल्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असेल, अशी माहिती चार्टर्ड अकाऊंटंट उमेश शर्मा यांनी दिली.

जालना : आगामी मार्च महिन्यानंतर राज्यासह देशभरात ई-वे बील लागू होणार असून, ते कुठल्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असेल, अशी माहिती चार्टर्ड अकाऊंटंट उमेश शर्मा यांनी दिली. यंदाचा अर्थसंकल्प हा समतोल असल्याचे ते म्हणाले. सहकारी भारतीच्या वतीने आयोजित ई-वे बिल मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.कलश सिड्सच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी आयोजित या शिबिरास ज्येष्ठ कर सल्लागार श्रीनिवास भक्कड, सहकारी भारतीचे जिल्हाध्यक्ष शिवरतन मुंदडा, कलश सिड्सचे संचालक समीर अग्रवाल, उपाध्यक्ष हेमंत ठक्कर आणि सहकार भारतीचे सचिव अ‍ॅड. दशरथ इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शर्मा म्हणाले की, प्रामुख्याने ई-वे बील तयार करताना ते ए' आणि बी' अशा टप्यात बनवावे लागणार आहे. बील बनल्यानंतर ते दोन तासात रद्द करून दुसरे बिल बनवणे शक्य आहे. बैलगाडीतून वस्तू अथवा माल पाठविणे आणि ५० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी ई-वे बिलाची गरज राहणार नाही. प्रामुख्याने ई-वे बिल आणि संबंधित वाहनांची रस्त्यावर दोन ठिकाणी तपासणी होऊ शकते. एकतर सीमेवर अथवा एखाद्या वेळेस आयुक्तांच्या मनात आल्यास, अशा वेळी तपासणी झाल्यास आणि त्यात त्रुटी आढळल्यास किमान २५ हजार रुपयांच्या पुढे दंडाची तरतूद आहे. जीएसटी, ई-वे बीलासह पूवीर्पासूनच अनेक बाबींची तरतूद शासनाने केलेली आहे. शेती आणि आरोग्यावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतीसाठी ठोस धोरण राबविण्याचा प्रयत्न आगामी काळात होणार असून, ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आलेल्या आहे. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निरसन केले. सहकार भारतीचे शिवरतन मुंदडा यांनी प्रास्ताविकात विविध मुद्यांवर भूमिका मांडली.हेमंत ठक्कर यांनी सूत्रसंचालन केले. हरीश बागवे यांनी आभार मानले. यावेळी सहकारी भारतीचे मराठवाडा संघटक विजय देशमुख, आडतीय असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, उद्योजक फुलचंद भक्कड, अरुण लाहोटी, गोवर्धन करवा, पीयूष मुंदडा, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, सुनील जोशी, व्यापारी रमेशचंद्र तवरावाला, विनित साहनी, महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दादराव तुपकर, किशोर देशपांडे, उद्योजक अरुण अग्रवाल, सीए चंद्रकांत चोबे यांच्यासह उद्योजक, व्यापारी आणि कर सल्लागारांची उपस्थिती होती.------------चांगला परिणाम दिसून येईल-श्रीनिवास भक्कडअध्यक्षीय समारोप करताना श्रीनिवास भक्कड म्हणाले की, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील अनेक बाबी सध्या तरी अस्पष्ट आहेत. मात्र, एकंदरीत अर्थसंकल्पाचा अभ्यास केल्यास त्याचा भविष्यात निश्चितच चांगला परिणाम दिसून येणार आहे. कृषीला देण्यात आलेली प्राथमिकता विशेष उल्लेखनीय असून, त्यात शेतीमालाचे भाव कमी-जास्त होऊ नये म्हणून राबविण्यात येणा-या योजनेचेही त्यांनी स्वागत केले.