शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सील केलेल्या मालमत्तेचा कर लवकर भरा, जालना नगरपालिका करतेय लिलावाची तयारी

By विजय मुंडे  | Updated: March 24, 2023 18:55 IST

पीआरकार्डवर येणार पालिकेचे नाव : थकीत कर भरण्यासाठी आठ दिवसांची मुभा!

जालना : थकीत कराच्या वसुलीसाठी नगर पालिकेने शहरातील १०- २० नव्हे तब्बल ५०० मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना सील करून टाळे ठोकले आहे. ३१ मार्च पर्यंत संबंधितांनी कराचा भरणा न केल्यास संबंधित मालमत्तांच्या पीआर कार्डवर पालिकेचे नाव लावणे किंवा लिलाव करून कराची वसुली करण्याची तयारी पालिका प्रशासन करीत आहे. त्यासाठी ३१ मार्च नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर प्रस्तावही दिला जाणार आहे.

जालना नगर पालिकेची शहरातील थकबाकीदारांकडे तब्बल १०० कोटी रूपयांचा कर थकीत आहे. थकीत कराची वसुली व्हावी, यासाठी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गत महिन्यापासून थेट कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. थकीत कर असणाऱ्या मालमत्ता धारकांना नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, या नोटिसांना अनेकांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे वरिष्ठांनी कराची वसुली सक्तीने करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार कारवाईसाठी नियुक्त असलेल्या पथकांनी कर थकीत असलेल्या १० - २० नव्हे तब्बल ५०० मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना कलम १५२ नुसार सील टोकले आहे. सील ठोकल्यानंतर संबंधितांना थकीत कराचा भरणा करण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे.

३१ मार्च पर्यंत कराचा भरणा करणाऱ्यांच्या मालमत्तांचे सील काढले जाणार आहे. परंतु, कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांच्या पीआर कार्डवर नगर पालिकेचे नाव लावणे किंवा मालमत्तांचा लिलाव करून कराची वसुली करण्याची मोहीम कलम १५६ नुसार राबविली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असून, त्याबाबतचा प्रस्तावही ३१ मार्च नंतर नगर पालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होताच मालमत्तांचा लिलाव करणे किंवा पीआरकार्डवर पालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही होणार असल्याचे पालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

एका महिन्यात दोन कोटींची वसुलीनगर पालिकेच्या चार पथकांनी मालमत्ता सील करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शहरातील थकबाकीदारांनी एका महिन्यात २ कोटी ७० लाख रूपयांचा कर नगर पालिकेकडे भरला आहे. चालू आर्थिक वर्षात जवळपास १४ कोटी ३१ लाख रूपयांचा थकीत कर आजवर वसूल झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

वेळेवर कराचा भरणा करावाअधिक कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना पालिकेने सील ठोकले आहे. ३१ मार्च पूर्वी कराचा भरणार करणाऱ्यांच्या मालमत्तांचे सील काढले जाणार आहे. परंतु, मुदतीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर कलम १५६ ची कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळताच पुढील कारवाई होईल. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वेळेवर कराचा भरणा करावा.- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, जालना

टॅग्स :TaxकरJalanaजालना