शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जुना जालन्यातील गर्दीने रुग्णावाहिकाही अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:55 IST

जुना जालन्यातील गांधीचमन चौक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच बनले आहे. रविवारी दुपारी रेल्वेस्थानक चौकात तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली. यात एक रुग्णवाहिकेसह अप्पर पोलिसांची गाडीही अडकून पडली.

ठळक मुद्देवाहतूक पोलीस बेपत्ता : रविवार बाजाराने नेहमीच वाहतूक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालन्यातील गांधीचमन चौक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच बनले आहे. रविवारी दुपारी रेल्वेस्थानक चौकात तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली. यात एक रुग्णवाहिकेसह अप्पर पोलिसांची गाडीही अडकून पडली. पुढे जाण्याच्या नादात रुग्णवाहिकेला रस्ता करून दाखविण्याची माणुसकी कुणी दाखवली नाही.ग्रामीण भागातून येणारा स्वस्त, ताजा भाजीपाला थेट शेतकºयांकडून मिळत असल्याने बाजारात येणाºयांची गर्दीही अधिक असते. मात्र, गत काही महिन्यांपासून या बाजारात काही स्थानिक विक्रेतेही आपली दुकाने थाटत आहेत.फेरीवाले थेट रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.शिवाय रेल्वेस्थानक चौकात ग्रामीण भागातून येणारी अनेक चारचाकी वाहने जागा मिळेल तिथे उभी केली जात असल्याने बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी होत आहे. आज दुपारी रेल्वेस्थानक चौकात स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याजवळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे गांधीचमनकडे बाजारात येणाºया रस्त्यासह मस्तगड चौकाकडे जाणाºया रस्त्यावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली. पुढे जाण्याच्या नादात वाहनधारक रस्ता मिळेल तशी वाहने पुढे नेत असल्याने कोंडी सुटण्याऐवजी आणखीच वाढली.दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रेल्वेस्थानकाकडून मस्तगडकडे जाणारी रुग्णवाहिकाही कोंडीत अडकून पडली.विशेष म्हणजे ऐरवी राज्यमंत्र्यांच्या ताफ्यात भरधाव जाणारी पोलिसांची स्काँटिंग गाडीही वाहतूक कोंडीत सापडली. या ठिकाणी वाहतूक कर्मचारी हजर नसल्यामुळे शेवटी स्थानिक नागरिक व काही रिक्षा चालकांनी रस्त्यावर उतरुन वाहतूक कोंडी सुरळीत केली.