शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

खराब रस्त्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती; घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:54 IST

खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णालयात जाण्यास झालेला विलंब व धक्के बसल्याने एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावर रविवारी सकाळी हा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णालयात जाण्यास झालेला विलंब व धक्के बसल्याने एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावर रविवारी सकाळी हा प्रकार घडला. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.तीर्थपुरी ते बानेगाव या १५ किलोमीटर रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनातून ये-जा करणा-यांना धक्के बसत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा प्रत्यय रविवारी बानेगाव येथील एका कुटुंबाला आला. सुजाता चंद्रकांत पानखडे यांना पहाटे प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाइक त्यांना तीर्थपुरी येथील रुग्णालयात नेण्यासाठी जीपचे नियोजन केले.सुजाता यांची नाजूक स्थिती व खराब रस्ता या स्थितीत जीप तीर्थपुरीकडे निघाली. खड्डेमय रस्त्यामुळे धक्के बसल्याने सुजाता यांच्या वेदना वाढल्या. सात किलोमीटर पुढे आल्यानंतर सकाळी सात वाजता त्यांची रस्त्यातच प्रसूती झाली. त्यांनी एका मुलास जन्म दिला.अर्धा तासानंतर त्यांना तीर्थपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. खड्डेयम रस्त्यामुळे बाळाला श्वासोच्छवासास त्रास झाल्याने दोन तास कृत्रिमरीत्या आॅक्सिजन देण्यात आला.रुग्णालयात येण्यास आणखी काही वेळ उशीर झाला असता, तर बाळ दगावले असते, अशी शक्यता डॉ. सीमा उढाण यांनी व्यक्त केली.