शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महाकाळ्याच्या मुकादमाचा सोलापुरात खून, ऊसतोड मजूर न पाठविल्यामुळे घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 20:55 IST

वडीगोद्री (जि.जालना) : ऊसतोड कामगार न पाठवल्याचा राग मनात धरून महाकाळा येथील मुकादमाचा सोलापूर येथे खून करण्यात आला. ही घटना दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे घडली.

वडीगोद्री (जि.जालना) : ऊसतोड कामगार न पाठवल्याचा राग मनात धरून महाकाळा येथील मुकादमाचा सोलापूर येथे खून करण्यात आला. ही घटना दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे घडली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबड तालुक्यातील महाकाळा येथील मुकादम रामदास रतन गिरी (३७, रा. महाकाळा) याने सोलापूर येथील संशयित अय्याज पाटील जाफर पाटील (रा.सोलापूर) यांच्या बरोबर चालू गळीत हंगामासाठी ऊसतोड कामगार पुरवण्यासाठी पैसे घेऊन २५ सप्टेंबरला कायदेशीर करार पत्रही करून दिले होते. १८ पुरुष व १८ महिला मजूर पुरविण्याचे या करारात नमूद होते. यासाठी रामदास गिरी यांना आठ लाख रुपये देण्याचे करारानुसार निश्चित करण्यात आले.पैकी दोन लाखांचा भारतीय स्टेट बँकेचा चेक गिरी यांना देण्यात आला. मजुरांना घेऊन जाण्यासाठी संशयिताने सोलापूरहून ५ नोव्हेंबरला शहागड येथे दोन ट्रॅक्टर पाठवले. मात्र, रामदास रतन गिरी यांच्याकडून मजूर उपलब्ध न झाल्याने ट्रॅक्टर परत पाठवले. याचा राग मनात धरून संशयित आरोपी अय्याज पाटील जाफर पाटील हा काही लोकांना सोबत सोमवारी रात्री शहागड येथे आला.अय्याज पाटील याने मयत रामदास गिरी यास फोन करून शहागड येथे बोलून घेतले. त्यानंतर रामदास गिरी यास बळजबरीने पांढ-या रंगाच्या स्कॉर्पिओ ( एमएच १३, एएक्स १३१३) या गाडीमध्ये बसून सोलापूर येथील औंज परिसरात नेले. तिथे रामदास गिरी यांना जबर मारहाण केली. त्यानंतर संशयित अय्याज पाटील याने रामदास गिरी यांचा चुलत भाऊ राजेंद्र गिरी यांना फोन केला. तुझा भाऊ रामदास गिरी यांच्या नाकातून रक्त येऊ लागल्याने आम्ही त्यांना सोलापूरच्या शासकीय दवाखान्यात दाखल केले आहे. गिरी यांचे नातेवाईक खासगी वाहनाने सोलापूर येथे पोहोचले.मात्र, उपचारापूर्वीच रामदार गिरी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर व स्थानिक पोलिसांनी सांगितले. संशयितांनी रामदार गिरी यांना जबर माहराण केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण अंगार सूज आलेली होती, असे त्यांचा चुलतभाऊ राधाकिसन गिरी यांनी सांगितले. या प्रकरणी राधाकिसन गिरी यांच्या फिर्यादीवरून अय्याज पाटील जफर पाटील व अन्य सहा जणांवर गोंदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहागड चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करत आहेत.

टॅग्स :Murderखून