यावेळी हिंदू समाज संस्थेच्या प्रा.अंजली बडवे यांनी रक्तदानाचे गैरसमज व रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य नितीन कोळेश्वर व राष्ट्रीय सेवा योजनेचे जालना जिल्हा समन्वयक प्रा.सोमीनाथ खाडे, भाऊसाहेब देशपांडे कॉलेज ऑफ बायोटेक्नोलॉजी अॅड. बायोइन्फॉर्मेटिक्सच्या प्रा.ज्योती पडोळ, प्रा.तिवारी, शिवाजी चव्हाण, मुख्याध्यापिका मीनाक्षी कुलकर्णी, मनीषा देव यांची उपस्थिती होती. जालना येथील जनकल्याण रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले. कार्यक्रमामध्ये संदीप इंगोल व शालिनी इंगोले यांनी घरी तयार केलेले मास्क मोफत वाटप केले. कार्यक्रमाच्या आयोजनाचा भार प्रा.ज्योती पडोळ यांनी सांभाळला. सूत्रसंचलन संदीप इंगोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवाजी चव्हाण यांनी केले. शिबिरासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान करणे म्हणजे माणुसकीचे मूल्य जपणे - सोमिनाथ खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST