शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दिंडी मार्गात राजकारण नको; वारक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:00 IST

शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. तर हजारो भाविकांच्या श्रद्धेच्या विषय असणा-या या मार्गात राजकारण करू नये, असे निवेदन वारक-यांनी खा. शेट्टी यांना वाटूर येथे दिले.

जालना/परतूर : शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा विरोध नाही. मात्र, रस्त्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमीन संपादित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा; अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी परतूर येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. तर हजारो भाविकांच्या श्रद्धेच्या विषय असणा-या या मार्गात राजकारण करू नये, असे निवेदन वारक-यांनी खा. शेट्टी यांना वाटूर येथे दिले.शनिवारी परतूर येथे सभेनिमित्त आलेल्या खा. शेट्टी यांची वाटूर फाटा येथे वारक-यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. दिंडी मार्गात विनाकारण राजकारण आणले जात आहे. स्वत: ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मूठभर लोक दिंडीमार्ग रोखण्याचे काम करीत आहेत.वाटूर, परतूर, आष्टी, लोणी, माजलगाव हा रस्ता १९७२ मध्ये बनला होता. त्यामुळे हा रस्ता नव्याने होणे वारक-यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याचा मोबदला आता देता येत नसेल तर अशा शेतक-यांनी कोर्टात जाऊन आपली बाजू मांडावी, परंतु शेगाव- पंढरपूर हा दिंडी मार्गात अडथळा निर्माण करू नये असे निवेदनात म्हटले आहे.परतूर येथे आयोजित मेळाव्यातही खा. शेट्टी यांनी दिंडी मार्गाबाबत भूमिका स्पष्ट केली.या वेळी ह.भ.प. रामकिशन नानवटे, भरत खोसे , रामराव ढवळे, बबन, पांडुरंग महाराज, बंडू धुपा पवार, साळिकराम नानवटे, प्रेमसिंग महाराज, ज्ञानेश्वर सोळंके, कारभारी सातपुते, रामदास सुरनर, बालचंद्र बच्छिरे, दगडोबा चांदणे, अशोक दाभाडे, रमेश वायाळ, दिनकर काकडे, मच्छिंद्र राऊत, दत्ता महाराज कुटनीकर, भास्कर टकले, ओमप्रकाश जाधव, यांच्यासह वारक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.