शाळाबाह्य मुलांसाठी पर्यायी व्यवस्था करा
जालना : पन्नास टक्के उपस्थितीच्या अटीवर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख डॉ. आत्मानंद भक्त यांनी केली आहे. खासगी शाळांनी फीसच्या नावाखाली ऑनलाईन शिक्षण बंद केले, तर न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
जालना : भाजप जिल्हा कार्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, बद्री पठाडे, सिध्दिविनायक मुळे, सुभाष सले, बाबासाहेब कोलते, सुनील खरे, संजय डोंगरे, प्रा. राजेंद्र भोसले, सीमा बिर्ला, ममता कोंड्याल, प्रमोद गंडाळ, उमेश पेंढारकर, कृष्णा खिल्लारे, श्रीराम मोहिते आदींची उपस्थिती होती.
आर्थिक जागरूकता विषयावर व्याख्यान
जालना : शहरातील व्हीएसएस महाविद्यालयात आर्थिक जागरूकता विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयातील डॉ. राजेश लहाने यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. प्रसाद मदन, डॉ. गजानन चौधरी, प्रा. नम्रता देशमुख, प्रा. रोहित पिपरीये, प्रा. जयेश मीनासे, प्रा. प्रतिक्षा वाघूळ, प्रा. नेहा गुप्ता, प्रा. सोनाली राठोड, प्रा. श्वेता पटवारी, प्रा. पूजा यादव, प्रा. जया तोंडूळे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.