शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दोन महिन्यानंतर लाभले जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:49 IST

दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जालना जिल्हाधिकारी पदावर सोमवारी रवींद्र बिनवडे हे रूजू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जालना जिल्हाधिकारी पदावर सोमवारी रवींद्र बिनवडे हे रूजू झाले. रूजू झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शासनाने जो प्राधान्यक्रम ठरवला आहे, त्यानुसार काम करणार असून, सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यावरही माझा भर राहील असेही ते म्हणाले.आपण मुळचे मराठवाड्यातील असल्याने येथील जवळपास सर्वच परिस्थितीची माहिती आहे. यापूर्वी नंदूरबार येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पदावर असताना अनेक कामे केली आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेला आपले प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी म्हणून आपली ही पहिलीच पोस्टींग असल्याने प्रथम आपण जिल्ह्यातील सर्व विभागांची माहिती घेऊन दौरा करणार आहोत. त्यानंतर कुठल्या बाबीला प्राधान्य द्यायचे हे ठरवू असे ते म्हणाले.प्रशासकीय यंत्रणेत आलेली मरगळ दूर करणे यालाही आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच नेमका फोकस कोणत्या कामावर राहणार या बाबत मात्र, लगेचच सांगणे योग्य ठरणार नसल्याने त्यांनी स्पष्ट केले.पालिकेच्या वतीने नगराध्यक्षांकडून स्वागतनूतन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे स्वागत जालना नगर पालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, नगरसेवक रमेश गौरक्षक, अ‍ॅड. राहुल हिवराळे यांच्यासह अन्य नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि जिल्हाधिकारी यांच्या शहरातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना