ज्वारीवर मावाचा प्रादुर्भाव
अंबड : सततच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या ज्वारी पिकावर मावा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतीत झालेे असून, महागडी औषधे फवारणी करीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
कारवाईची मागणी
परतूर : तालुक्याच्या ग्रामीण भागात खुलेआम गुटख्याची विक्री केली जात आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे, परंतु टपऱ्या, हॉटेलसह दुकानांमध्येही गुटख्याची विक्री होत असून, विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
चालकांची कसरत
जालना : शहरांतर्गत विविध भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यावरून वाहने चालविताना चलाकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जालना : येथील सरस्वती भुवन प्रशालेतील विद्यार्थ्यांना डॉ.मधुर करावा यांनी कोरोनातील दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी सुनील रायठठ्ठा यांनी करावा यांचे स्वागत केले.