बखळे यांची निवड
बदनापूर : पोलीस पाटील संघटनेच्या बदनापूर तालुकाध्यक्षपदी सुभाष बखळे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी घनश्याम घुले, सचिवपदी शत्रुघ्न बरांडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे तालुक्यात सर्वत्र स्वागत केले जात आहे.
मुलांना मार्गदर्शन
घनसावंगी : तालुक्यातील राणीउंचेगाव केंद्रांतर्गत शाळेतील पाचवी व आठवी वर्गातील मुलांना दैनंदिन शिष्यवृत्ती, नवोदयसाठी मार्गदर्शन केले जात आहे. गटशिक्षणाधिकारी जोशी, केंद्रप्रमुख सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.
खवणे यांची निवड
मंठा : परतूर विधानसभा बूथ रचना प्रमुखपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश खवणे यांची निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी खवणे यांची नियुक्ती केली आहे. खवणे यांच्या या निवडीबद्दल परतूर तालुका व परिसरात स्वागत केले जात आहे.
मस्तगड भागात अस्वच्छता
जालना : शहरातील मस्तगड येथून जवळच असलेल्या तुळजाभवानी नगर भागातील रिकाम्या प्लॉटवर अस्वच्छ पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, पालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.