शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार लिटर ताक वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:10 IST

चंद्रप्रभू जैन मंदिरातील जिन शासन सेवा ग्रुपच्यावतीने भगवान महावीर यांच्या २५४७ व्या जनकल्याणक महोत्सवा निमित्त गुढी पाडव्यापासून सलग ७२ दिवस मामा चौकातील क्रिस्टल कॉम्प्लेक्समध्ये वाटसरूंसाठी थंड ताकाचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील चंद्रप्रभू जैन मंदिरातील जिन शासन सेवा ग्रुपच्यावतीने भगवान महावीर यांच्या २५४७ व्या जनकल्याणक महोत्सवा निमित्त गुढी पाडव्यापासून सलग ७२ दिवस मामा चौकातील क्रिस्टल कॉम्प्लेक्समध्ये वाटसरूंसाठी थंड ताकाचे वाटप करण्यात आले.भगवान महावीर हे ७२ वर्ष जगले होते. त्यामुळेच सलग ७२ दिवस ताक वाटपाचा उपक्रम येथील जिन शासन सेवा ग्रुपने हाती घेतल्याची माहिती यावेळी ज्येष्ठ उद्योजक विनयकुमार आबड यांनी दिली. युवकांनी केलेल्या सेवेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.रविवारी सकाळी या ताक वाटप उपक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी विनयुकमार आबड, अशोक बिनायकिया, उद्योजक शिवरतन मुंदडा, संजय लव्हाडे, सुरेश मुथा, अजित छाबडा, अ‍ॅड. अनिल संचेती, शंकर शर्मा, स्वरूपचंद ललवाणी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिी होती.यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक होता. त्यामुळे लोकांना पाण्यासोबच थंड पेय म्हणून ताक वाटपाचा उपक्रम जिन शासन सेवा ग्रुपने घेतला. त्यासाठी समाजातील दानशुरांची मोठी मदत झाल्याची माहिती प्रास्ताविकातून दीपक मोदी यांनी दिली. यावेळी शंकर शर्मा यांनी जागा तसेच लाईट उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचा विनयकुमार आबड यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी आबड म्हणाले की, आजची युवा पिढी ही सक्षम असल्याचे आम्हाला या उपक्रमातून दिसून आले. भविष्यातही या युवकांकडून अशाच चांगल्या उपक्रमांची आशा त्यांनी व्यक्त केली. दररोज ६०० लिटर मसाला ताक वाटपासाठी ज्यांनी मदत केली त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिन शासन सेवा ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरSocialसामाजिकReligious Placesधार्मिक स्थळे