शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटी रुपयांच्या मंजुरीवरून सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:59 IST

सभा संपल्यानंतरच अध्यक्षांनी सदर रकमेत वाढ करून १ कोटी ५० लाखांच्या कामांना मंजुरी दिली. अध्यक्षांनी कोणत्या अधिकाराखाली या कामांना मंजुरी दिली, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील सभेत सिंचन विभागातून बांधकाम विभागात १ कोटी रुपये वर्ग करण्याचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाला सभागृहाने मंजुरी देखील दिली होती. परंतु, सभा संपल्यानंतरच अध्यक्षांनी सदर रकमेत वाढ करून १ कोटी ५० लाखांच्या कामांना मंजुरी दिली. अध्यक्षांनी कोणत्या अधिकाराखाली या कामांना मंजुरी दिली, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. त्यानंतर या कामाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली.मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती कळंबे, सभापती तौर, सभापती बनसोडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांची उपस्थिती होती.सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद व उन्नाव येथील घटनेत मयत झालेल्यांना युवतींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सदस्य अवधूत खडके म्हणाले की, मागील सभेत अध्यक्षांनी सिंचन विभागातून बांधकाम विभागात १ कोटी रुपये वर्ग केले होते. याबाबत सभेत ठरावही घेण्यात आला. परंतु, अध्यक्षांनी या रक्कमेत ५० लाखांची वाढ करून कामांना मंजुरी दिली. या रकमेत वाढ करण्याची गरज काय ? तसेच सभा संपल्यानंतर अध्यक्षांनी रात्री आठ वाजता सदरील रकमेच्या कामांना मंजुरी दिली. रातोरात मंजुरी देण्याचे कारण काय, असा सवाल करून या कामात अनियमित्तता झाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अवधूत खडके यांनी केली. या प्रकरणावरूनच सभेत गोंधळ उडाला. भाजपचे सदस्य व अध्यक्षांमध्ये वादावादी झाली. यावर उत्तर देताना अध्यक्ष म्हणाले, सदर प्रकरणात कुठल्याही प्रकारची अनियमित्तता झाली नाही. तुम्ही म्हणत असला तर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.त्यानंतर सदस्य शालीकराम म्हस्के यांनी या प्रकरणावरून अध्यक्षांना धारेवर धरले. कार्योत्तर देण्यासाठी अध्यक्षांनी कोणता अधिकार वापरला. याचे उत्तर अध्यक्षांनी द्यावे. उत्तर नसेल तर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, अध्यक्षांचे काम असेल तर प्रशासन २४ तास उपलब्ध असते. परंतु, शेतकरी, सदस्यांची कामे असेल तर प्रशासन उपलब्ध नसल्याचेही ते म्हणाले. या सभेस सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.म्हस्के : मालकीच्या जागेवर दुकाने थाटलीजिल्हाभरात जेवढ्या जि.प.च्या मालकीच्या जागा आहे. त्यांना तारेचे कुंपण करा, अशी मागणी मागील दीड ते दोन वर्षांपासून मी आणि जयमंगल जाधव यांनी केली. परंतु, अद्यापही प्रशासनाने या जागांना कंपाऊंड केले नाही. त्यामुळे काही जागांवर तर दुकाने थाटली आहेत.भोकरदन येथे जि.प.च्या जागेवर अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्य शालीकराम म्हस्के यांनी केला.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदPoliticsराजकारणfundsनिधी