शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल, पेट्रोलचा टँकर विद्युत खांबावर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:19 IST

मनमाडहून घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ बुधवारी पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : मनमाडहून घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ बुधवारी पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.विशेष म्हणजे इंधनाने भरलेल्या या टँकर ने विद्युत खांबाला धडक दिल्यानंतर त्यात विद्युत प्रवाह होता. जर टँकरने पेट घेतला असता तर अवघा परिसर जळून खाक झाला असता.मात्र, पाचोड पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिसर गर्दीमुक्त करून वीजपुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला.याबाबत अधिक माहिती अशी की, घनसावंगी (जि.जालना) येथील सयाजीराव देशमुख यांचा घनसावंगी येथे पेट्रोल, डिझेलचा पंप आहे. बुधवारी टँकरचालक मनमाडहुन घनसावंगीकडे जात असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे धुळे -सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाटा येथे टँकर (एम.एच-२६.एच-६९११) उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला धडकले. टँकर विद्युत खांबाला धडकले तेव्हा त्यात ६ हजार लिटर पेट्रोल तर ६ हजार लिटर डिझेल होते.सुदैवाने विद्युत प्रवाह सुरु असलेल्या या खांबाला टँकर धडकल्यानंतर त्याने पेट घेतला नाही. नसता रोहिलागड फाटा परिसर, रोहिलागड, दाभरूळ, थापटी तांड आदी गाव परिसरात मोठी जीवित हानी झाली असती असे सांगण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी घेतली तातडीने धावदरम्यान, रोहिलागड फाट्यावर पेट्रोल घेऊन जाणारे टँकर उलटल्याची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्षक खरड, जमादार फोलाने, बनगे, काकडे, कल्याण राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसर गर्दीमुक्त केला. तसेच मार्गावरील वाहतूक थांबवून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित केला. यामुळे पुढील अनर्थ टळला. यासोबतच पोलिसांनी भारत पेट्रोलियमच्या अधिका-यांना अपघाताची माहिती दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Accidentअपघातelectricityवीज