शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार पिंपळगाव परिसरात डेंग्यूचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:38 IST

कुंभार पिंपळगाव परिसरात डेंग्यूने पीडित असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये या आजाराच्या भीतीने दहशत पसरली आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : कुंभार पिंपळगाव परिसरात डेंग्यूने पीडित असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये या आजाराच्या भीतीने दहशत पसरली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी स्वच्छता जागरण मोहीम सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.कुंभार पिंपळगाव परिसरात मागील दोन महिन्यांपासून तापाची साथ पसरल्याने योग्य उपचाराअभावी काही नागरिकांना डेंग्यू आणि मलेरिया च्या आजाराने ग्रासले आहे. तर गावातील स्वच्छता मोहीम थांबल्याने पसरलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू तापाची साथ पसरली आहे.नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, परंतु काही रुग्ण ताप आल्यावर आधी गावातील बोगस डॉक्टरांकडून प्रथमोपचार करीत आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.तर अनेक गावांमध्ये तापाच्या साथीने रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गाववस्त्यांमधील पसरलेल्या घाणीमुळे व साचलेले पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतने स्वच्छता मोहिमेला गती देण्याची गरज आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी औषधांची फवारणी आवश्यक आहे.परंतु प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेण्यास ग्रामपंचायत मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.आरोग्य विभागाने नागरिकांना तत्परतेने उपचारासाठी पथक तयार करून सेवा देण्याची गरज आहे.तसेच अस्वच्छतेमुळे डासांची होणारी वाढ नष्ट करण्यासाठी स्वच्छता जागरण मोहीम सुरू करावी व तापाची साथ पसरू नये यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाने उपाय सुचविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य