लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिलांचे विविध प्रश्न त्वरित सोडवावेत, या मागणीसाठी सिटू संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावे, आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न सोडवावे, घर कामगार, सफाई सफाई कामगार महिलांचे प्रश्न सोडवावे यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सिटूचे राज्य सचिव अण्णा सावंत, अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सुनंदा तिडके यांनी मार्गदर्शन केले.जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, जिल्हा सचिव गोविंद अरदड, कांता मिटकरी, साजेदा बेगम, राही वाघ, शुभांगी कुलकर्णी, उषा तंगे, द्वारका घोडके, रेणुका तिकांडे, रेणुका सिरसाट, राहुल हनवते, अजित पंडित, हरिश्चंद्र लोखंडे आदींची उपस्थिती होती.
विविध मागण्यांसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:27 IST