कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे लॉकडाऊनमधील थकीत वीज बिल माफ करावे, सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, वीज बिलासाठी खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा, कर्मचाऱ्यांकडून होणारी अरेरावी थांबवावी, आदी विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी भाजपा अजा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे, जिल्हा सरचिटणीस कैलास शेळके, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश ढोणे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सुरेश उगले, सुरेश पोटे, संतोष सोसे, अमोल काळे, भाजपा अजा तालुकाध्यक्ष रामदास भालेराव, सुनील शेंडगे, आदींची उपस्थिती होती.
(फोटो)