रोहिलागड येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता सातवी पर्यंत वर्ग आहेत. शासनाने पाचवीपासून पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याच धर्तीवर पहिली ते चौथी वर्ग सुरू करावेत, अशी मागणी पालकांनी शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश टकले, उपाध्यक्ष पांडुरंग टकले, मुख्याध्यापक कल्याण कोकडे यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे. यावेळी संदिपान पाटील, अशोक गाढे, ज्ञानेश्वर टकले, मदन टकले, नानासाहेब मगरे, आप्पासाहेब चंदनशिव, शिवाजी टकले, बाळासाहेब टकले, गणेश टकले, मुंतजीर तांबोळी, कांताराम टकले, नारायण कदम आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, पालकांचे निवेदन प्राप्त होताच आम्ही शालेय समितीच्या वतीने ठराव घेऊन मुख्याध्यापक कल्याण कोकडे यांच्याकडे दिलेला आहे. वरिष्ठांना पालकांची मागणी कळविली असून, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे सुरेश टकले यांनी सांगितले.