घरकुल आवासचा लाभ देण्याची मागणी
जालना : जिल्ह्यातील वंचितांना महाआवास घरकुल योजनेतून घरकुल द्यावे, अशी मागणी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाप्रमुख ॲड. भास्कर मगरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी भानुदास घुगे, जय खरात, भाऊसाहेब तांबे, तुळशीदास पटेकर आदींची उपस्थिती होती.
खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका
अंबड : माहेरभायगाव ते रोहिलागड या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम केले आहे. परंतु, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संबंधितांनी लक्ष देवून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सरपंच एकनाथ जायभाये, सरपंच अर्जुन वाघ, साहेबराव लबडे, दिनकर वाघ, भीमराव वाघ, कृष्णा खांडेभराड आदींनी केली आहे.