अजय पाटील यांना पीएचडी पदवी
भोकरदन : तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील रहिवासी प्राध्यापक अजय माणिकराव पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान केली आहे. प्रा. पाटील हे पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात कार्यरत आहेत.
उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार
टेंभुर्णी : कोरोनात शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण मिळावे, यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांचा गटसाधन केंद्रात सत्कार करण्यात आला. यावेळी खासगाव शाळेवरील दीपक खरात यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डाएटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, अधिव्याख्याता डॉ. वैशाली जहागीरदार, डॉ. सुनीता राठोड, डॉ. सतीश सातव, गटशिक्षणाधिकारी जिनेंद्र काळे आदींची उपस्थिती होती.
अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाढलेले रस्ता अपघात यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.
रांजणीतील पालक मेळाव्यास प्रतिसाद
रांजणी : येथील विवेकानंद इंग्लिश स्कूल व नित्यानंद प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी आयोजित पालक मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्राचार्य एस. के. मोठे, मुख्याध्यापक एस. एम. उफाड, बी. ए. हरबक, जी. एम. जाधव आदींची उपस्थिती होती.